पुसेसावळी : शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली.सर्वात अगोदर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करून हरणाई देवी मंदिराशेजारीलतलावातील आणि कडेला असणारी अनावश्यक झाडेझुडुपे काढण्यात आली. तसेच त्या तलावातील कागद, प्लास्टिक, पत्रावळ तसेच इतर कचरा गोळा करण्यात आला. त्यासोबत टेहळणी बुरुजाकडील परिसर कचरा मुक्त करण्यात आला.अनावश्यक झाडे तोडून उपटून काढल्यानंतर त्यापासून पुन्हा फुटवे फुटू नयेत, यासाठी झाडांच्या मुळावर आणि न तोडलेल्या झाडाच्या बुंध्यावर रासायनिक पदार्थ्यांचा प्रयोग करण्यात आला .त्यानंतर सर्व नवीन मावळ्यांना एकत्र बसवून दुर्ग संवर्धन तसेच त्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. दुर्ग संवर्धन हे एकट्या-दुकट्याचे कार्य नसून ते सर्वांचे आहे. त्यात सर्वांचीच महत्वाची भूमिका आहे. हा ऐतिहासिक वारसा जपणे किती महत्वाचे आहे हे समजून सांगण्यात आले.आपल्या सर्वांवरच ही जबाबदारी आहे आणि ती कशी पार पाडावी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यात स्वत:चे योगदान जास्तीत जास्त कसे देता येईल, यासाठी प्रत्येक मावळ्यात नवीन उमेद जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी दुर्ग इतिहास व स्वराज्याची उद्दिष्टे यांचे स्पष्टीकरण करण्यात आले.दुर्ग भ्रमंतीत गडाचे काय महत्व आहे, हे स्पष्ट करण्यात आले आणि शेवटी प्रेरणा मंत्राच्या साहाय्याने सर्वांना हे कार्य अखंड चालू आणि स्वहस्ते करण्यास प्रेरित करून ही अभ्यासपूर्ण मोहीम पूर्णत्वास नेण्यात आली.
किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:23 IST
शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली.
किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम
ठळक मुद्दे किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम हरणाई देवीच्या मंदिराशेजारी तलावातील झाडे-झुडपे हटविली