शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

जमिनीतून रस्ता नेण्यावरून खेड नांदगिरीत तुंबळ हाणामारी

By दीपक शिंदे | Updated: May 10, 2023 13:51 IST

कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी

कोरेगाव : खेड नांदगिरी येथे जमिनीतून रस्ता नेण्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये व त्यांच्या नातेवाइकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.तेजस उदयसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी ११ ला सुमारास खेड नांदगिरी येथील झरा शिवार नावाच्या शिवारामध्ये जमीन गट क्रमांक ६८४ मध्ये तहसीलदारांच्या आदेशाने अडथळा काढण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी व पोलिस पाटील यांच्यामार्फत बंदोबस्तात कार्यवाही सुरू होती.यावेळी बबन गणपत कदम, प्रफुल्ल गणपत कदम, राजेंद्र दशरथ कदम यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कार्यवाहीदरम्यान अर्जुन विनायक कदम, कमलसिंग विनायक कदम, वैभव अर्जुन कदम, सागर सत्यवान कदम यांनी आम्ही आता उभ्या पिकातून जेसीबी घालून रस्ता बनवणार आहे, असे सांगितले.त्यावेळी तेजस कदम, राजेंद्र दशरथ कदम, सारंग रामचंद्र कदम, शारदा प्रफुल्ल कदम यांनी उभ्या पिकातून जेसीबी घालायचा नाही, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करत धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित पोलिसांसह महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भांडणे सोडविली. अर्जुन विनायक कदम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तहसीलदारांच्या आदेशाने रस्त्याच्या कब्जेपट्टीच्या अंमलबजावणीचे काम सुरू असताना आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक जमा झालो होतो. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतामध्ये जात असताना तेजस उदयसिंह कदम, विठ्ठल प्रफुल्ल कदम, संदीप चंद्रकांत कदम, सारंगनाथ रामचंद्र कदम, रोहित रवींद्र कदम, सचिन बबन कदम, बबन गणपती कदम, रवींद्र रामचंद्र कदम, प्रफुल गणपत कदम व शुभम सुरेश गोळे यांनी आम्ही तुम्हाला येथून जाऊन देणार नाही तसेच तुम्ही आमच्या शेतात पाय ठेवला तर हात-पाय काढून तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी शिवीगाळ करत धमकी देऊन अर्जुन विनायक कदम, सागर सत्यवान कदम, प्रतीक कमलसिंग कदम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून कोरेगाव पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी