शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

युगांडाहून फलटणला आलेले चौघे जण पॉझिटिव्ह, ओमायक्रॉनची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 18:06 IST

युगांडा वरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

फलटण : फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याच्या शक्यतेने शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.पॉझिटिव्ह आलेले हे एकाच कुटुंबातील चौघेजण त्यामध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते काल परदेशातून फलटण मध्ये आले होते. याची माहिती प्रशासनाला समजताच त्यांनी त्यांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. त्याचा रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव्ह आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली का नाही? याची शक्यता प्रशासन पडताळून पाहत असून त्यांचे रिपोर्ट मुंबई, पुण्यात प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत.दिनांक 9 डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडा वरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीसुद्धा त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर काल ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. प्रशासनाने त्यांचे काल स्वॅब घेतले होते. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांनी तातडीने प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कडक उपायोजना करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेची आज नागरिकांना माहिती समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गेले आहे. आफ्रिकेतील युगांडा हा देश असल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन