शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात तरुणावर प्राणघातक हल्ला; शेकडो नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 12:40 IST

लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मलकापूर : लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत मलकापूरमधील शेकडो नागरिकांनी आज, गुरुवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.मलकापुरातील मुख्य चौकात काल, बुधवारी भरदिवसा युवकांच्या टोळक्याने एकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला. शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेत मलकापूरातील आशा गुंड प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी गुरूवारी मलकापूरातील शेकडो नागरीक एकत्र आले. एकत्र आलेल्या शेकडो नागरिकांनी थेट कराड शहर पोलिस ठाणे गाठले.शहरात गुंड प्रवृत्तीची टोळकी तयार झाली आहेत. लहान मुलांना धमकावून भीती घालत आहेत. यापूर्वीही संशयितांनी हल्ला करून युवकाच्या हाताची बोटे तोडली होती. संशयित वारंवार शहरात दहशत माजवत असून त्यांच्या गुंडगिरीला वेळीच पायबंद घालणं गरजेचे आहे. अशी मागणी करत पोलिस अधिकाऱ्यांसमोर गऱ्हाणे मांडले.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिले. त्यानंतर बी. आर. पाटील यांनी कायद्यानुसार संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. संशयितांना अटक करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहेत. असे सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात जमलेला जमाव शांत झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीKaradकराड