शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:22 IST

खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देदर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खर्चही निघत नसल्याने चिंता

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.खटाव तालुक्यात अगोदरच पिण्यासाठी पाणी नाही. त्यातच शेतकरी ठिबकच्या माध्यमातून अशा प्रकारची पिके घेत असतात. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांनी मिरची घेतली आहे; पण या मिरचीला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे.यामुळे मिरचीसाठी केलेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यातच मिरचीसारखी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणले. परिणामी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कमी दरामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोडणीचा खर्चसुद्धा परवडत नाही. आता कोणत्या पिकांकडे वळावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेती अडचणीत येऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.सिमला मिरचीची लागण करण्यासाठी साधरणत: एका एकरास दहा ते अकरा हजार रोपे लागतात. एका रोपाची किंमत दोन रुपये २० पैसे, मलचिंग पेपर, ठिबक सिंचन, लागवडीसाठी मजूर तसेच औषध फवारणी असा मिळून एकरी एक लाखापर्यंत खर्च येतो.

या पिकाला आजच्या बाजारात दहा रुपये दर मिळत आहे. आज एका मजुराला एका दिवसाला ३५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करण्याऐवजी कामाला जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

मिरचीची लागण करण्यास खर्च जास्त आला आहे. त्यातच दराची घसरण झाल्यामुळे तोडणीचे सुद्धा पैसे निघत नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा पिकांच्या संदर्भात शासनाने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.- अरविंद शिंदे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर