शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

चिल्लर टंचाईची भिकाऱ्यांनाही झळ!

By admin | Updated: January 23, 2015 23:40 IST

दानधर्मातही अडचण : देणारा म्हणतो, ‘दहाची नोट वाटून घ्या’

सातारा : दान देऊन पुण्य कमवायचे ही आपली संस्कृती. परंतु त्या ठिकाणीही आजकाल अडचणी येऊ लागल्या आहेत. एकीकडे मंदिरातून बाहेर पडल्यावर दान मागणारे अनेक आणि दुसरीकडे नाण्यांची टंचाई... अखेर देणारा म्हणतो, ‘दहाची नोट देतो. वाटून घ्या.’गेल्या काही महिन्यांपासून सुट्या पैशांची मोठी चणचण भासत आहे. त्यामुळे इच्छा असूनही भिक्षेकऱ्यांना दान देणे काहींना जमत नाही. दुसरीकडे, मंदिराच्या दारात असंख्य भिकारी रांगेने बसलेले दिसतात. सगळेच दान मागतात. काही भक्तांनी यावर उत्तम तोडगा शोधला आहे. एका भिक्षेकऱ्याजवळ दहाची नोट दिली जाते आणि ‘वाटून घ्या’ असे सांगितले जाते. शुभकार्य करण्याआधीही अनेकजण दानधर्म करतात. दान केल्याने संभाव्य संकट टळते, असे शास्त्रवचन असल्याने दानाला महत्त्व दिले गेले आहे. दान साधारणत: प्रार्थनास्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक प्रमाणात दिले-घेतले जाते. प्रार्थनास्थळी भिक्षेकऱ्यांची संख्या जास्त असते. सध्या बाजारात एक, दोन रुपयांत होऊ शकणारे व्यवहार जवळजवळ बंद झाले आहेत. भिकारीही एक रुपया दिल्यास चेहरा आंबट करतात. दुसरीकडे, पाच, वीस आणि पन्नास रुपयांच्या नोटा मिळणे (मिळाल्यास त्या चांगल्या असणे) मुश्किल झाले आहे. भाजीमंडईत दहाच्या नोटांचा तुटवडा जाणवतो. खिशात चिल्लर जवळजवळ नसतेच. भिक्षेकऱ्यांना दान म्हणून सामान्यत: एक, दोन किंवा पाच रुपये दिले जातात. देवाची परडी घेऊन पैसे मागत फिरणाऱ्या, लहान मुलांना काखोटीला घेऊन फिरणाऱ्या महिला अचानक समोर येतात. खिशात हात घालताच चिल्लर नसल्याचे कळते. अशा वेळी ‘दान विभागून’ ही संकल्पना अनेकांनी जवळ केली आहे. (प्रतिनिधी)दहा द्या... चिल्लर देतोकाही जण भिकाऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी खिशात हात घालून ‘सुटे पैसे नाहीत’ असा बहाणा करतात. अशा वेळी ‘दहाची नोट द्या, चिल्लर देतो,’ असे म्हणणारे भिकारीही आता दिसू लागले आहेत. भीक विभागून देताना दहाची नोट आणि समोर भिकारी मात्र १२-१५ असे चित्र असल्यास देणाऱ्याची अडचण होताना दिसत आहे.