शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वानराच्या धपक्याचा मुलांनी घेतलाय धसका..!

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

पाठीवर उडी मारून वानरे घेतायत चावा; घबराटीचे वातावरण

वडूज : ‘पळा.. पळा वानरं आली’ म्हणण्यापूर्वीच विद्यार्थी दशेतील मुलांच्या पाठीवर असलेल्या दप्तरावरच झडप मारून त्या मुलांच्या शरीरावर चावा घेऊन वानरांच्या टोळीने वडूज शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, वानराच्या धपक्याने मुलांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे सदृश्य चित्र पाहावयास मिळत आहे.सकाळी साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये जाण्यासाठी जय पाटोळे व त्याचा मित्र महंमद मुल्ला (इयत्ता पहिली) हे दोघे दहिवडी-कऱ्हाड या मुख्य रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी आठ ते दहा वानरे असणारी टोळी येथीलच एका बँकेच्या कठड्यावर बसलेली होती. दरम्यान, एका वानराने जयच्या पाठीवर थेट उडी घेतली. यामध्ये जय रस्त्यावरच कोसळला. रहदारी असणाऱ्या रस्त्यावरच हा थरार सुरू होता. जयच्या पाठीवर दोन-तीन मिनिटे झाली तरी ते वानर त्याच अवस्थेत त्याचा चावा घेण्यासाठी प्रयत्न करीत होते; परंतु शाळेचा युनिफॉर्म असलेली जयची पँट जाड कापडाची असल्यामुळे चावा घेताना वानराला कठीण जात होते. बँकेतील काही लोक व इतर नागरिक धावून आल्यामुळे ते वानर पळून गेले. परंतु जयच्या गुडघ्याला जखम झाली. व त्याच बरोबरीने मांडीलाही त्या वानराचे दात लागले. भयभीत झालेला जय त्या परिस्थितीत घरी न जाता थेट शाळेत गेला. पूर्णपणे गांगरून गेलेला जय व त्याचा मित्र महंमद मधल्या सुटीत पोषण आहार घेत होते. जय मात्र या वानर हल्ल्यामुळे चांगलाच भयभीत झाला होता. प्रत्यक्षदर्शी डॉ. वैभव बेंद्रे जयला दवाखान्यात न्यायचे म्हणून आले; परंतु त्या आधीच तो शाळेत गेला. येथीलच हॉटेलचालक अनिल भोकरे व रवी काळे यांनी जय व त्याच्या मित्रास ‘तुम्हाला घरी सोडतो म्हटले; परंतु त्याही अवस्थेत हे दोघे मित्र ‘जय-वीरू’ शाळेत गेले. (प्रतिनिधी)याबाबत वनक्षेत्रपाल सुरेश घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता वानर पकडणारे जिल्ह्यात लोक नाहीत. तर वाई येथील ‘मंकी चाचा’ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नकार दर्शविला. वनविभागाकडे पिंजरा नसून या संदर्भात खर्चाची तरतूद नसल्याचे सांगून घाडगे म्हणाले, ‘याबाबत (खर्चाच्या तरतुदीसाठी) ग्रामपंचायतीला लेखी कळविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.-सुरेश घाडगे, वनक्षेत्रपाल, वडूज