शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Satara: ग्रामीण भागातील मुले आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवतील - सचिन तेंडुलकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:15 IST

म्हसवड येथे ‘इनडोअर स्पोर्टस् बास्केटबॉल व बॅडमिंटन सेंटरचे उद्घाटन

म्हसवड : ‘ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी असणाऱ्या क्रीडा गुणांना वाव मिळावा व ग्रामीण भागातील मुले विविध क्रीडा प्रकारांत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित ठसा उमटवतील,’ असा विश्वास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केला.म्हसवड, ता. माण येथे सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मदतीने महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील ग्रामीण इनडोअर स्पोर्टस् बास्केटबॉल व बॅडमिंटन सेंटरचे उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. अंजली तेंडुलकर, संचालिका सारा तेंडुलकर, माणदेशी फाउंडेशनच्या सर्वेसर्वा चेतना सिन्हा, विजय सिन्हा, रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे, प्रभात सिन्हा, अनघा कामथ-सिन्हा, करण सिन्हा, दिव्या प्रभात-सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात सचिन तेंडुलकर फाउंडेशनने क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आणि संचालक सारा तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला भेट दिली. येथील माण देशी फाउंडेशनने विकसित केलेल्या म्हसवड येथील पहिल्या ग्रामीण इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन हे त्यांच्या भेटीचे वैशिष्ट्य ठरले.हे स्टेडियम ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे प्रतिभा विकास आणि समुदाय सहभागासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. उद्घाटनादरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी या भागातील लोकांच्या लवचिक भावनेबद्दल प्रशंसा व्यक्त केली आणि समुदायांना एकत्र आणण्यासाठी, तसेच वैयक्तिक विकासासाठी संधी प्रदान करण्यासाठी खेळाचे महत्त्व याबाबत विशद केले.

सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि माणदेशी फाउंडेशन यांच्यातील हे सहकार्य महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी एक शाश्वत आणि आशादायी वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे. या कार्यक्रमादरम्यान, दिव्या प्रभात सिन्हा यांनी माणदेशी चॅम्पियन्स या ॲथलीट्सवरील पुस्तकाच्या प्रकाशनाची संकल्पना सादर केली.

सचिन आणि सारा तेंडुलकर यांनी उपस्थितांशी साधला संवाद..इनडोअर स्टेडियम क्रीडा प्रकल्पांचे केंद्र बनेल, ज्यामुळे स्थानिक तरुणांना फायदा होईल आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल. हा कार्यक्रम स्थानिक समुदायाच्या उत्साहाने भरलेला होता. अनेक जण स्टेडियममध्ये दिल्या जाणाऱ्या क्रीडा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. सचिन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला, तरुण खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि चिकाटी व कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर