शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:39 IST

वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावलीतिघांवर दरोड्याचा गुन्हा

सातारा : वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.विजय उर्फ पिल्या नलवडे, मंगेश चव्हाण, अमर चौगुले, अजय पवार, सचिन पवार (सर्व रा. बोगदा परिसर, समर्थ मंदिर सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,चेतन संतोष पवार (वय २१, रा. डबेवाडी, ता. सातारा) हा महाविद्यालयीन युवक दि. ७ रोजी रात्री मित्रासह दुचाकीवरून घरी निघाला होता.

यावेळी बोगदा परिसरातील पॉवर हाऊसजवळ वरील पाचजणांनी त्यांना अडवले. त्यानंतर लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच चेतनच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेली. या प्रकारानंतर चेतनने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती.

जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठारमलकापूर : जखिणवाडी, ता. कऱ्हाडयेथे बिबट्याने हल्ला करत शेळ्यांच्या नरड्याचा चावा घेऊन तीन शेळ्या ठार केल्या. दरम्यान, शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आरडाओरड केल्यामुळे दोन कोकरे बचावले.

पाटील मळ्यात किसन पाटील यांच्या वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जागीच दोन शेळ्या ठार झाल्या. तर एक गंभीर जखमी झाली. त्या जखमी शेळीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा वनविभागाच्यावतीने करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर