सिंधुदुर्गनगरी : महिला व बालविकास विभागाचा निधी बऱ्याचवेळा कारणाशिवाय वाया जात असल्याचा आरोप चक्क महिला व बालविकास समिती सभापती स्रेहलता चोरगे यांनी करीत बालविकास विभागात अनागोंदी कारभार होत असल्याचे शिक्कामोर्तब केले.जिल्हा महिला व बालविकास समितीची सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी वंदना किनळेकर, निकिता तानवडे, श्रावणी नाईक, रूक्मिणी कांदळगावकर, कल्पिता मुंज यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. महिला बालकल्याण समितीच्या सभेत मागील सभेच्या प्रोसिडींग वाचनावरून झालेल्या चर्चेत सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण प्रस्तावांना मंजुरी यादीला अनुमोदन म्हणून माझे नाव घेण्यात आले. परंतु या यादीबाबत मला कोणतीही माहिती नाही तेव्हा माझे नाव तेथून काढून टाका, असे सांगत सदस्या वंदना किनळेकर यांनी यादीला आक्षेप घेतला. कोरम पूर्ण नसताना काही सभेत ठराव घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही होते. सभेचे प्रोसिडींग फायनल व्हायच्या अगोदर ज्या गोष्टी होऊ नयेत त्या गोष्टी होतात, असा सनसनाटी आरोप वंदना किनळेकर यांनी केला. महिला बालविकास विभागात नको तिथे बराच निधी कारणाशिवाय खर्च केला जात असल्याचा खळबळजनक आरोप खुद्द सभापती स्नेहलता चोरगे यांनी सभेत करून महिला व बालविकास विभागाच्या अनागोंदी कारभारावर शिक्कामोर्तब केले. (प्रतिनिधी)स्मरणपत्र काढामहिला व बालविकासअंतर्गत येणाऱ्या काही अंगणवाड्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे अशा अपूर्ण काम असणाऱ्या संबंधितांना स्मरणपत्र काढा, असे आदेश सभापती चोरगे यांनी दिले.
महिला बालविकासचा अनागोंदी कारभार
By admin | Updated: January 17, 2015 00:12 IST