शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साताऱ्यातील पोवई नाका-बसस्थानक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल, वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाय

By सचिन काकडे | Updated: December 22, 2023 19:05 IST

सातारा : पोवई नाका ते बस स्थानक मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला ...

सातारा : पोवई नाका ते बस स्थानक मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या व आत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना इनगेट व आउटगेटकडे वळण्यास निर्बंध घालण्यात आले असून, एसटीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.पोवई नाका ते बस स्थानक या मार्गावर व्यापारी, विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवर हातगाडीधारकांनी बस्तान बसविल्याने पादचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून धोका पत्करून चालावे लागत आहे, शिवाय बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटसमोर, तसेच शाहू क्रीडा संकुलासमोर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने, वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.या सर्व समस्यांची पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दखल घेतली असून, बस स्थानक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. दि. २५ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, वाहनधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

बंदी घालण्यात आलेला मार्ग..

  • पोवई नाक्यावरून बस स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटकडे वळण्यास बंदी राहील.
  • राधिका रस्त्यावरून बस स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटकडे वळण्यास बंदी.
  • बस स्थानकाच्या आउटगेटमधून बाहेर पडणाऱ्या सर्व एसटी बसेसला उजवीकडे वळण्यास मनाई असेल.
  • राधिका चौक व मनाची कॉर्नरला जोडणारा मार्केटयार्डमधील रस्ता नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

वाहतुकीचा पर्यायी मार्ग असा..

  • पोवई नाक्यावरून बस स्थानकाकडे मार्गस्थ होणाऱ्या सर्व एसटी बसेस नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील सर्कलला वळसा घालून इनगेटमधून बसस्थानकात प्रवेश करतील.
  • पोवई नाका, राधिका रस्त्यावरून येणारी सर्व प्रकारची वाहने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील सर्कलला वळसा घालून बस स्थानक, पोवई नाका, पारंगे चौकाकडे जातील.
  • बस स्थानकातील आउटगेटमधून मेढा, महाबळेश्वर, वाई, मुंबई, पुणे बाजूकडे जाणाऱ्या एसटी बसेस तहसील कार्यालय, जिल्हा बँक, पोवई नाका जीएसटी भवन, पारंगे चौक, जुना आरटीओ चौकमार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व वाढे फाटा बाजूकडे मार्गस्थ होतील.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी