शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत बदल, आजपासून होणार अंमलबजावणी

By दीपक शिंदे | Updated: June 7, 2023 14:45 IST

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांसाठी वाहतुकीत तात्पुरता बदल

सातारा: देशातून तसेच परदेशातून लाखो पर्यटक महाबळेश्वरला पर्यटनाला येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुधवार, दि. ७ ते २५ जून या कालावधीत प्रायोगिक तत्वावर दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

महाबळेश्वर, पाचगणी ही जागतिक दर्जाची थंड हवेची पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी राज्यातून तसेच देशातून लाखो पर्यटक पर्यटनासाठी भेट देत असतात. तसेच पर्यटनासाठी येणारी विदेशी पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी काही दिवसांसाठी हा वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.नवा वाहतुकीचा बदल पुढीलप्रमाणे: मुंबई-पुणे बाजूकडून महाबळेश्वरसाठी येणारी वाहनांची वाहतूक सुरूर फाटा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर (एकूण ४८ किमी) ला जाईल. तसेच पाचगणी बाजूकडून पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी पाचगणी-वाई, सुरूर फाटा या मार्गाचा वापर पर्यटकांना करता येणार नाही. त्यासाठी पाचगणी-संजीवन विद्यालय, पाचगणी, रुईघर महू डॅम रस्त्याने करहर-कोळेवाडी, कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.महाबळेश्वर बाजूकडून पुणे-मुंबईसाठी जाणारी वाहतूक महाबळेश्वर वरून मेढा-कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाईल. किंवा महाबळेश्वर-मेढा, सातारा पुणे अशी पुणे-मुंबईकडे जाईल. याबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या ईमेल आयडीवर पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानंतर अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

अन्यथा मोठा वळसा घ्यावा लागेल...महाबळेश्वर बाजूकडून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक पाचगणी मार्गे जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना लिंगमळा-भेकवली मार्गे महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील लिंगमळा फाटा-मेढा कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे बाजूकडे वळविली जाईल. त्यामुळे ज्या रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याच रस्त्याने पर्यटकांनी आपला प्रवास करावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटनTrafficवाहतूक कोंडी