शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य, प्रशासनही हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:01 IST

sand Wai Satara-वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली त्यामुळे वाईच्या तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर संबंधित तलाठ्यावरच कारवाई करण्याची वेळ तहसीलदारांवर आली. यामुळे वाळू तस्करांसह तलाठ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य, प्रशासनही हादरले वाईतील तहसीलदारांची संबंधित तलाठ्यावर कारवाई

वेळे : वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली त्यामुळे वाईच्यातहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर संबंधित तलाठ्यावरच कारवाई करण्याची वेळ तहसीलदारांवर आली. यामुळे वाळू तस्करांसह तलाठ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील दिवसा ढवळ्या विना परवाना हजारो ब्रास वाळू उपसा सुरू होता. त्याच गावातील गेली कित्येक वर्षापासून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून मनोज भोईटे हा वाळूचा व्यवसाय करत असतो. २५ फेब्रुवारी रोजी मनोज भोईटे हा विना परवाना वाळू उपसा करत असल्याची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळाली. त्यांनी तलाठी डी. डी. कुंभार यांना ओढ्याच्या पात्रात चोरुन उत्खनन होत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याचे मोबाईलवरुन आदेश दिले होते.

या आदेशाचे पालन करुन तलाठी कुंभार घटना स्थळावर पोहचून त्यांनी चोरुन काढलेल्या वाळूचा आणी चाळणी, टिकाव, खोरी या वस्तू जप्त केल्या. त्यांचा पंचनामा करून सर्व साहित्य वाईच्या तहसीलदार कार्यालयात जमा केले. पंचनामा तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे पुढील कारवाई साठी देण्यात आला.या दिलेल्या पंचनाम्याची गंभीर दखल तहसीलदार रणजित भोसले यांनी घेऊन त्यांनी तत्काळ वाळू चोर असणारा मनोज भोईटे याला १ लाख १८ हजार रुपये दंडाची नोटीस काढून ती तातडीने तलाठी, सर्कल मार्फत बजावून त्याची पोहच घेऊन पुन्हा त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते पण तलाठी कुंभार तलाठी यांनी तहसीलदार यांचा लेखी आदेश धुडकावून काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने तलाठी वर्गा मध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारSatara areaसातारा परिसरwai-acवाई