शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत

By नितीन काळेल | Updated: March 3, 2023 23:50 IST

सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते.

सातारा : ‘अजिंक्यतारा किल्ल्याने परकीयांचे वार झेलले तसेच शिवसेनेनेही ५५ वर्षांत वार अंगावर घेतले. सेनेतच आता ४० गद्दार निघाले. पाटणचे पापाचं पितर शंभू का चंबू यांना शिवसेना नसती तर मंत्रिपदही मिळाले नसते. ३७ वर्षांनंतर त्यांच्या घराण्यात मंत्रिपद आले,’ असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षल कदम आदी उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार राऊत म्हणाले, ‘दोन दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात शिवगर्जना मेळावे झाले. यामध्ये पक्ष गेला, चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना चपराक मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक येऊन भेटले. त्यांनी गद्दारांच्या नावाने बोंबा मारल्या, तर निवडणूक आयोगाने गद्दारांच्या बाजूने निकाल दिला. कोणी म्हणते आयोगाला शिवी दिली. पण, ज्याची लायकी जशी, तशीच भाषा वापरावी लागते. त्यातच आता ५० खोके एकदम ओके ही देशात लोकप्रिय शिवी झालेली आहे.

महाराष्ट्र गद्दारांची बेईमानी विसरणार नाही. त्यांच्या कपाळी इतिहास लिहिला आहे, असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, ‘मोदी आणि शाहांनी महाराष्ट्राला ओळखले नाही. आम्ही मरू पण, वाकणार नाही. आता तर निवडणूक आयोग बेकायदा ठरवलाय. २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिलाय, त्यांना चुना लावू. कारण, कागदावर आमचे चिन्ह गेले असलेतरी ठाकरे ब्रॅंड आमच्याकडे आहे.

मार्गदर्शन अन् टीकास्त्र...- मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी पडले. त्यावेळी पंत आणि मिंद्यांनी कट रचला. याचा आपण सूड घेऊया.- भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत पलटी मारली. २०२४ मध्ये सूड घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करू.- आमचे सरकार पाडण्यासाठी २ हजार कोटी दिले.

छत्रपतींच्या वंशजांची तडजोड...खासदार राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भाजपशी तडजोड केली. भाजपला कधीच शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही, असेही ते म्हणाले.

खंजीर खुपसला तर कोथळा काढू...शिवसेना चक्रव्यूहात सापडली, असे वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. कारण, शिवसेनेने ५० वर्षांत अनेक वार झेलले आहेत. समोरून वार केला तर आम्ही करू. पण, जर कोणी पाठीमागून पाठीत खंजीर खुपसत असेल तर मागे वळून त्यांचा कोथळा बाहेर काढू, असा इशाराही राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSatara areaसातारा परिसर