शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बाटली फोडण्यास मनाई केल्याने खून- बोरगावमध्ये चौघांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 21:03 IST

सातारा : बोरगावमध्ये उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री आठ वाजता दारूची बाटली फोडणाऱ्या विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी, ता. सातारा) याला मनाई केल्याच्या रागातून त्याने चौघांवर चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.पुणे-बेंगलोर महामार्गावर बोरगाव, ता. सातारा येथील उड्डाणपुलाखाली काही ...

ठळक मुद्देगुन्हा दाखल, आरोपीस पोलीस कोठडी

सातारा : बोरगावमध्ये उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री आठ वाजता दारूची बाटली फोडणाऱ्या विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी, ता. सातारा) याला मनाई केल्याच्या रागातून त्याने चौघांवर चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पुणे-बेंगलोर महामार्गावर बोरगाव, ता. सातारा येथील उड्डाणपुलाखाली काही लोक गप्पा मारत बसले होते. दरम्यान, विशाल शितोळे हा दुचाकीवर त्याठिकाणी आला. तो स्वत:कडील दारूची बाटली त्याठिकाणी फोडत होता. त्यावेळी विजय साळुंखे, दीपक साळुंखे, अनिल साळुंखे व उत्तम माळवे (सर्व रा. बोरगाव) यांनी हटकले. याचा राग मनात धरून विशाल चौघांशी बाचाबाची करू लागला. त्यानंतर संतापलेल्या विशालने स्वत:कडील चाकूने विजय साळुंखे यांच्या पाठीत वार केला. तर इतरांच्या हात व पायावर वार केला. यात ते चौघेही जखमी झाले. त्यानंतर तातडीने चौघांना रुग्णालयात दाखल केले असता विजय साळुंखे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आरोपी विशाल शितोळे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून शितोळे याला अटक केली. पोलीस तपासात त्याने बाटली फोडत असताना चौघांनी विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. दरम्यान, विशालला न्यायालयात दाखल केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखूनCrimeगुन्हा