शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाफळला पोलिसांचा खडा पहारा!, दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:23 IST

CoronaVirus Satara : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या सुधारित आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना चाफळ पोलिसांनी मंगळवारपासून रस्त्यावर खडा पहारा ठेवला आहे. दरम्यान, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे ३० दुचाकी गाड्या जप्त करत वाहनधारकांवर चाफळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देचाफळला पोलिसांचा खडा पहारा!, दंडात्मक कारवाईरस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या तीस दुचाकी जप्त

चाफळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या सुधारित आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना चाफळ पोलिसांनी मंगळवारपासून रस्त्यावर खडा पहारा ठेवला आहे. दरम्यान, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे ३० दुचाकी गाड्या जप्त करत वाहनधारकांवर चाफळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनचे सुधारीत आदेश पारित केल्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ बिटाचे अमृत आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड यांनी मंगळवारपासून चाफळ विभागात कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच चाफळ-पाडळोशी या मुख्य रस्त्यासह चाफळ गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर खडा पहारा ठेवला आहे.

लॉकडाऊन काळात कडक निर्बंध लागू केलेले असताना विभागातील काहीजण राजरोसपणे नेहमीच्या फिल्मी स्टाईलमध्ये दुचाकी गाड्या चालवत आहेत. या महाभागांना चाफळ पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवत मंगळवारी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे ३० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे मोकाट फिरणारांना चांगलाच दणका बसला आहे.दरम्यान चाफळ व परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहनजप्तीसारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अथवा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा चाफळ बिटाचे पोलीस नाईक अम्रुत आळंदे यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbikeबाईकSatara areaसातारा परिसर