शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

युक्रेनमधील विद्यार्थ्यांबाबत केंद्र असंवेदनशील; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:49 IST

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती आता पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड (जि. सातारा) : युक्रेनमध्ये अडकलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणे व उद्घाटने करत फिरत आहेत. ते युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत फार गंभीर आहेत, असे वाटत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.  कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती आता पाहायला मिळत आहे.विधिमंडळ अधिवेशनावेळी राष्ट्रगीत सुरू असताना राज्यपाल तेथून निघून गेले. इतिहासात यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. राज्यपालांनी असे वागून राष्ट्रगीताचा, घटनेचा तसेच राज्यातील तमाम जनतेचा अपमान केला असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

मुंबई-बंगळुरू कॉरिडॉर महत्त्वाचा... nकऱ्हाडच्या विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. nबांधकाम परवान्यांबाबतची अनिश्चितता संपली असून, कऱ्हाड व परिसरात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. nत्यासाठी कऱ्हाड-चिपळूण रेल्वे व रस्ते वाहतूक व्हावी तसेच मुंबई ते बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर मंजूर व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण म्हणाले.