कोरेगाव : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास प्रतिसाद देत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी भगवी गुढी उभारली, तर काही ठिकाणी भगवा ध्वज फडकविण्यात आला.
तडवळे संमत कोरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयावर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक श्रीमंत झांजुर्णे, नीलेश झांजुर्णे, तलाठी ईश्वरसिंग नागलोट यांच्यासह हस्ते विधिवत पूजन करुन भगवा फडकवण्यात आला. या वेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
गोळेवाडीमध्ये सरपंच शंकर गोळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयावर भगवा फडकविण्यात आला. या वेळी सतीश गोळे, गणेश गोळे, किरण घोरपडे, गणेश कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
जरेवाडी येथे सरपंच पांडुरंग शितोळे यांच्या हस्ते भगवी गुढी उभारण्यात आली. या वेळी उपसरपंच रविकांत फडतरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, सरस्वती जरे, कर्मचारी सुवर्णा फडतरे उपस्थित होते.