शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘हर..हर.. महादेव’च्या गजरात रंगला ध्वज बांधण्याचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:29 IST

दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.श्री शंभू-महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर ...

ठळक मुद्देशिंगणापूर यात्रा : राज्यभरातील हजारो भाविकांची उपस्थिती

दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.श्री शंभू-महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्यात आला. मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस, जि. उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला यंदा ध्वज बांधण्याचा मान मिळाला.रविवारी दुपारी दोन वाजता ध्वजाचे आगमन झाले. यानंतर वाजत-गाजत ध्वज मंदिर परिसरात आणण्यात आला. दुपारी चार वाजता ध्वज बांधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हा साहसी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी शिंगणापुरात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिंगणापूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.अशी आहे प्रथाध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे. या पागोट्याला देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधले जाते. सुमारे दीडशे मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. या वस्त्राची गुढीपाडव्याला पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम पार पडतो.असा बांधलो जातो ध्वजप्रारंभी शिव मंदिराला ध्वजाचे एक टोक बांधले जाते. त्यानंतर हा ध्वज दोन्ही मंदिरांच्या मध्यावर आणला जातो. ध्वजाचे दुसरे टोक अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत कासऱ्याने खेचले जाते. तीन-चार व्यक्ती हा ध्वज वर खेचून घेतात. ध्वज बांधण्याची कसरत दोन तास चालते. ध्वज सुटू नये, याशिवाय मंदिरावरून खाली येऊ नये, याची दक्षता घेतली जाते. हा ध्वज उतरला की यात्रेचा समारोप होतो.