शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 13:50 IST

'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी प्रतापगडावरील वातावरण भारुन गेले होते.

सातारा : कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रोमांच उभा करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि तुता-यांचा आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.आज सकाळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप वनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते  भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली.  व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सपत्नीक आई भवानीची मनोभावे आरती केली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण कुंभरोशीच्या सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी  राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरबळ आदी उपस्थित होते.

त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक सुरु झाली. अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.  पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. 

यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पुजन करुन  अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने  साजरा करण्यात येत असल्याचे सांगून अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास विविध विभागांचे  शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPratapgad Fortप्रतापगड किल्लाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज