शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या मजल्यावरून पडताना पाय पकडला; तरीही गेला तिचा जीव, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: December 4, 2022 23:30 IST

कॅफेमध्ये मित्रांसोबत गेली होती वाढदिवसाला

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : विसावा नाक्यावरील एका प्रसिद्ध माॅलच्या चाैथ्या मजल्यावरून एक मुलगी खिडकीतून खाली पडते. त्याचवेळी एक मुलगा तिचा पाय पकडतो. तो मदतीची याचना करतो; पण शेजारी एक कार्यक्रम सुरू असल्यामुळे त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. शेवटी त्या मुलाच्या हाताला घाम फुटल्याने त्याचा हात सुटला आणि क्षणात ती मुलगी चाैथ्या मजल्यावरून खाली पडली अन् यात तिचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, विसावा नाक्यावर एक माॅल आहे. या माॅलच्या चौथ्या मजल्यावर एक कॅफे आहे. या कॅफेमध्ये दहावीतील मुले आणि मुली एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरून एक मुलगी अचानक खिडकीतून खाली पडते. इतक्यात एका मुलाने त्या मुलीचा पाय पकडला. मुलीचे डोके खाली पाय वर, अशी स्थिती होती. 

हृदयाचा ठोका चुकविणारे हे दृश्य या इमारतीच्या आजूबाजूचे लोक पाहत होते. नेमके काय करावे, हे कोणालाच सुचत नव्हते. तो मुलगा मात्र वाचवा, वाचवा, असे ओरडत होता. परंतु, त्याचा आवाज कार्यक्रमाच्या गोंगाटात विरून गेला. त्याने एकट्यानेच मुलीचा लोंबकळलेल्या स्थितीतील पाय धरला होता. क्षणात काहीही होऊ शकतं, या विचाराने त्या मुलाची पाचावर धारण बसली होती. 

अर्धा मिनीटही तो मुलगा तग धरू शकला नाही. हाताला घाम आणि मुलीच्या वजनामुळे त्याचा हात सुटला, तशी मुलगी सुमारे ५० फुटांवरून खाली पडली. यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. जेव्हा त्या मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्या मुलीची ओळख पटली. त्या मुलीचे नाव श्रेया श्रीकांत रासणे (वय १६, रा. शाहूपुरी गडकर आळी, सातारा) असे असल्याचे समोर आले आहे.

लोक मदतीसाठी जाण्यापूर्वीच सर्व काही संपलं

- खिडकीतून मुलगी खाली लोंबकळतेय. मुलाने तिचा पाय धरलाय, हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक ओरडू लागले.

- लोक त्या मुलाच्या मदतीसाठी इमारतीमधून धावू लागले. परंतु चौथ्या मजल्यावर पोहोचेपर्यंत त्या मुलाच्या हातून ‘त्या’ मुलीचा पाय निसटला होता.

- काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने नागरिक मात्र, अक्षरश: हबकून गेलेत.

‘ती’ कशी पडली, हे मात्र गुलदस्त्यातच

इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरून श्रेया खाली कशी पडली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. सातारा शहर पोलिसांनी संबंधित इमारतीमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Satara areaसातारा परिसर