अपघाताचा धोका
सातारा : राष्ट्रीय महामार्गालगतचे सेवा रस्ते काही ठिकाणी ‘असून अडचण नूसन खोळंबा’ असे झाले आहेत. लिंब खिंडीपासून रायगाव फाट्यापर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
खंडाळा : ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत नाशिक येथील वाघ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कृषिकन्या प्रणोती शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महामार्ग अंधारातच
सातारा : महामार्गाच्या दुभाजकामध्ये जागोजागी असलेले दिवे बंद असल्याने दुचाकीचालकांचे हाल होत आहेत. दुभाजकामधील प्रखर विद्युत दिव्यामुळे रात्रीच्यावेळी महामार्ग उजळून दिसायचा. आता तेथे कुट्ट अंधार असल्याचे पाहायला मिळते.
रस्त्याची दुरवस्था
सातारा : आनेवाडी ते मोरघर रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर सायगाव हे बाजारपेठेचे गाव असून, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. रस्ता खड्डेमय झाल्याने त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
भुयारी मार्ग पाण्याखाली
सातारा : रायगाव फाटा येथील भुयारी मार्ग पाऊस झाल्यानंतर पाण्याखाली जात आहे. या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठत असल्याने गैरसोय होत आहे. पाणी साठत असल्याने दुचाकी वाहनचालकांना तर हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.