सातारा : शहरातील एका ४२ वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला व्यवसायाने वकील आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तिकडून वारंवार फोन केला जात होता. जाणीपूर्वक त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्ती करत होती. तसेच मानसिक त्रास आणि घाबरविण्याच्या उद्देशाने फोनवर कॉल्स करून त्यांचा पाठलागही केला जात होता.
हे प्रकार वारंवार होऊ लागल्याने अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ज्या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन येत होता. तो मोबाईल नंबर त्यांनी पोलिसांना दिला आहे. त्या नंबरवरून पोलीस संबंधित संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. महिला वकिलांनाच अशा प्रकारच्या त्रासला सामोरे जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.