शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:35 IST

सहा जणांची करण्यात आली फसवणूक

सातारा : डाळिंब खरेदी-विक्री कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर दर महिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची तब्बल १ कोटी ४४ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार १६ फेब्रुवारी २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत फलटण येथे घडला आहे. विकास बबन सस्ते, मनीषा विकास सस्ते (सध्या रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. निरगुडी, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.याबाबत कृष्णात वसंत जाधव (वय ३७, रा. आसू, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये संशयित आरोपी दाम्पत्याने ‘राजलक्ष्मी इंटरप्रायझेस’ या नावाने कंपनी सुरू केली. शेअर मार्केटमध्ये व राजलक्ष्मी इंटरप्रायझेस या डाळिंब खरेदी-विक्री कंपनीमध्ये पैसे गुंतवलेल्या रकमेवर दर महिना ४ टक्के परतावा देतो, असे त्यांनी आमिष दाखवले. माझ्यासह गणेश वसंतराव जगदाळे (रा. मलठण, ता. फलटण), दीपक जगदाळे (रा. रामबाग, फलटण), संदीप टोणगे (रा. फलटण), दयानंद वाघमोडे (रा. निंभोरे, ता. फलटण), सचिन तावरे (रा. निरगुडी, ता. फलटण) आणि धीरज जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी नोटरी करारनामा केला. त्यानंतर आम्ही सर्वांनी वेळोवेळी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवले. अशाप्रकारे सहा गुंतवणूकदारांची मिळून एकूण १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची आरोपी दाम्पत्याने फसवणूक केली.