शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळकेवाडीत कारची काच फोडून चोरी; २४ तासांत चोरट्याला अटक 

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 19:40 IST

सातारा तालुका पोलिसांची कामगिरी : प्री वेडिंगसाठी गेल्यावर प्रकार

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : चाळकेवाडी, ता. सातारा येथे प्री वेडिंग फोटो शूटसाठी गेल्यावर उभ्या केलेल्या कारची काच फोडून दोन बॅगांसह कॅमेरे, फोटो शुटचे साहित्य चोरुन नेण्यात आले होते. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमीत प्रवीणकुमार चव्हाण आणि अभिजीत पोपट वारागडे (रा. शाहूपुरी, सातारा) हे प्री वेडींग फोटो शूटसाठी चाळकेवाडी येथे गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजुला त्यांनी कार उभी केली होती. फोटो शुटसाठी गेल्यावर अज्ञाताने कारची डाव्या बाजुची मागील काच फोडून कॅमेरे, फोटो शूटचे साहित्य दोन बॅगासह लंपास केले. या चोरीनंतर सुमीत चव्हाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला.

सातारा तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावला. तसेच याप्रकरणी रामचंद्र तुकाराम पवार (रा. मायणी, ता. जावळी) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून कॅमेरा, चार्जर, बॅटरी, माईक, लेन्स तसेच कागदपत्रे असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार वायदंडे हे करीत आहेत.पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक फार्णे, उपनिरीक्षक डी. ए. दळवी, हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, धनंजय कुंभार, तुकाराम पवार, महेंद्र नारनवर, डफळे आदींनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर