महाबळेश्वर (जि.सातारा) : पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटातील बावली टोक परिसरात वाहनावरील ताबा सुटून कार थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी पहाटे साडेपाच वाजता घडली. अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ व संगीता संकपाळ अशी जखमींची नावे आहेत.सातारा जिल्ह्यातील लाखवड (ता.महाबळेश्वर) येथील काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक-चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्याने वाहन ३०० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन अडकले.अपघाताची माहिती मिळताच, प्रतापगड सर्च ॲन्ड रेस्क्यू टीमचे संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने इतर सदस्यांना संपर्क साधत बचाव कार्य सुरू केले. जखमींनाही सुरक्षितरीत्या वर आणण्यात टीमला यश आले.
Web Summary : A car accident in Ambenali Ghat, Satara, left five people injured after the vehicle plunged 300-400 feet into a valley. Rescue teams successfully extracted the injured.
Web Summary : सतारा के अम्बेनाली घाट में एक कार दुर्घटनाग्रस्त हो गई, जिसमें वाहन 300-400 फीट गहरी खाई में गिरने से पांच लोग घायल हो गए। बचाव दल ने घायलों को सुरक्षित निकाला।