दहिवडी : शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात ४०० फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय अंदाजे- ५२) व हिराबाई सर्जेराव वावरे (७०) अशी मृतांची नावे आहेत.सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी काल (सोमवार) थदाळे या आपल्या मूळगावी आले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण माळशिरसकडे नातेवाईकाकडे निघाले होते. सकाळी ८-३० च्या सुमारास शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पहिल्या वळणावर ४०० फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला.
साताऱ्यातील शिंगणापूर घाटात भीषण अपघात; ४०० फूट खोल दरीत कार कोसळून मायलेकरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 15:10 IST