शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

By दीपक देशमुख | Updated: October 3, 2023 15:39 IST

आंदोलक आले हाफ पँट अन् पांढरा शर्ट परिधान करून, अनोख्या आंदोलनाने अधिकारी देखील अवाक

सातारा : कलेक्तल काका, आमच्या शाळा बंद कलू नका ना, असा बालहट्ट चक्क मोठया माणसांनी केला तर काय म्हणावे. परंतु, रिपाइंच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी असेच बोबडे बोल बोलत आणि उड्या मारतच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच हे आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे असा आग्रह धरला. जिल्हाधिकारी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनी जिल्हाधकाऱ्यांच्या कक्षा समोरच ठिय्या मारला. काही वेळाने व्हीसी संपवून जिल्हाधिकारी जितेन्द्र डूडी आले. यानंतर  त्यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.निवेदनात म्हटले आहे की, आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे. हे शिक्षण दत्तक देण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय संविधान विरोधी असून सर्वसामान्य वंचित मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे. सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नाही तर मग सरकारचा काय उपयोग?  हे मातृत्व अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संविधान विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनास सहभागी झाले होते.

सांग सांग एकनाथ.. शाळा टिकेल कायअजितकाका, देवेंद्र काका, सातारचे शंभू काका आणि एकनाथ काका आदींनाही निवेदन देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी सांग सांग एकनाथ.. शाळा टिकेल काय, अशी कविता महिला कार्यकर्त्यांनी सादर केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा