शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून थेट प्रसारण करा : उदयनराजे भोसले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:21 IST

Maratha Reservation : ''मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे माझे आणि संभाजीराजे यांचे एकच ध्येय आहे. राज्य शासनाने आरक्षणाच्या संदर्भाने श्वेत पत्रिका काढावी, अशी मी वारंवार मागणी केली. याबाबत राज्य शासनाने कोणतेही स्पष्टीकरण केले नाही. आरक्षण देणे हा राज्याचा विषय असून सर्वपक्षीय विशेष अधिवेशन बोलावून ते लाईव्ह टेलिकास्ट करावे,'' अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

ठळक मुद्देराज्याचे विशेष अधिवेशन बोलावून थेट प्रसारण करा : उदयनराजे भोसले पुणे येथील पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील नेत्यांवर जोरदार टीकास्त्र

सातारा : ''मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे माझे आणि संभाजीराजे यांचे एकच ध्येय आहे. राज्य शासनाने आरक्षणाच्या संदर्भाने श्वेत पत्रिका काढावी, अशी मी वारंवार मागणी केली. याबाबत राज्य शासनाने कोणतेही स्पष्टीकरण केले नाही. आरक्षण देणे हा राज्याचा विषय असून सर्वपक्षीय विशेष अधिवेशन बोलावून ते लाईव्ह टेलिकास्ट करावे,'' अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पुणे येथे एकत्रित बैठक झाली. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत चर्चा झाली, त्यानंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.उदयनराजे म्हणाले, ''आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्या सामाजिक व्यवस्थेत फुट पडलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७० वर्षांपूर्वी मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना आरक्षण मिळवून दिले. आता ७० वर्षानंतर परिस्थिती बदललेली आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज पडू लागली आहे.

मराठा समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षणाचे निकष ठरवले पाहिजे. इतरांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं त्याच पद्धतीने मराठा समाजाला देखील आरक्षण द्यावे, एवढीच आमची मागणी आहे. आरक्षणाचा लाभ आमच्यासारख्या श्रीमंत लोकांना होणार नाही तर दिन दुबळ्या लोकांनाच होणार आहे.''मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणार का या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ''हा प्रश्न संपूर्णतः राज्याचा आहे. न्यायालयात जाऊन तो सुटणार नाही, हे आता सिद्ध झाले आहे. राज्यातील नेत्यांनी आता दम असेल तर आरक्षणाबाबत बोलून दाखवाव. हे नेते जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असते तर मागेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. राज्य शासनाने तत्काळ अधिवेशन बोलावून लाईव्ह टेलिकास्ट करावं, म्हणजे सभागृहात एक बोलणारे आणि सभागृहाच्या बाहेर दुसरे बोलणारे लोकांसमोर येतील.''मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संभाजीराजे छत्रपती आणि विनायक मेटे असे दोन गट पडलेले आहेत तर समाजाने कोणता झेंडा हाती घेऊन जावे? या प्रश्नाबाबत छेडले असता उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो झेंडा हातात धरला होता, तो झेंडा घेऊन मराठा समाजाने लढा उभारला पाहिजे असे उत्तर दिले.मी केंद्राचा बघतो तुम्ही राज्याचा बघा...मराठा आरक्षणाच्या संदर्भाने विविध समित्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल दिले आहेत. गायकवाड समितीने देखील असाच अहवाल सादर केला होता, मात्र राज्यातील नेत्यांनी त्याचा अभ्यास केलेला दिसत नाही. राज्य सरकार अशा रिपोर्टची थप्पी लावून रद्दीत विकणार आहे काय? असा उद्विग्न सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला तसेच आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखविण्याआधी राज्यात काय? दिवे लावतात, ते पहा नंतरची रूपरेषा मी ठरवतो, असा इशाराच उदयनराजे यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीSatara areaसातारा परिसर