शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुरामुळे नुकसान : कुंभार व्यावसायिकांचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार : रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:51 IST

कऱ्हाड : अलमट्टी धरणातून पाणी अडवल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यास याचा फटका बसला आहे. कऱ्हाड येथील कृष्णा कोयना नदीपात्रात ...

ठळक मुद्देपुरामुळे नुकसान झालेल्या कुंभार व्यावसायिकांचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणारकऱ्हाड येथील नुकसानग्रस्त कुंभार व्यावसायिकांची भेट

कऱ्हाड : अलमट्टी धरणातून पाणी अडवल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यास याचा फटका बसला आहे. कऱ्हाड येथील कृष्णा कोयना नदीपात्रात गणेशमूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांच्या गणेशमूर्तींचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी म्हणून मुंबई येथे मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कऱ्हाड येथील कुंभार व्यावसायिकांची सोमवारी भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी कऱ्हाड  येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेनेचे गटनेते नितीन बानुगडे-पाटील, शशिकांत हापसे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कुंभार समाजबांधवांच्या वतीने मंत्री वायकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला असल्याने त्यात पुरामुळे गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधितांनी आपल्या मागण्या शासनाकडे सादर कराव्या, त्याबाबत योग्य तो निर्णय लवकर घेऊन संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाईल.यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले, कऱ्हाड येथे सुमारे ३० ते ४० मूर्ती व्यावसायिकांकडून चारशे ते पाचशे लहान-मोठ्या मूर्ती बनविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाच्या वतीने त्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा अहवाल प्रशासनाकडून लवकरच सादर केला जाईल.दरम्यान, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे कुंभार समाजबांधवांनी आपली जमीन टेंभू प्रकल्पबाधितांना देण्यात आले असून, त्याचा मोबदला मिळण्याची मागणी केली. यावेळी पाटील यांनी कुंभार समाजाने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, त्याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर