शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:21 IST

वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

ठळक मुद्देघरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोन टोळ्या हद्दपारसातारा, वडूज येथील टोळ्यांचा समावेश; एक वर्षासाठी कारवाई

सातारा: वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.टोळी प्रमुख आकाश शिवाजी वाघले-जाधव (वय २७, रा. गुलमोहर कॉलनी, वाई), करण रामसिंग घाडगे (वय २१, रा.सैदापूर,सातारा), राहूल अमर घाडगे (वय १८, रा. लाखानगर, वाई) भूपाल किसन घाडगे (वय ४०), कैलास भानुदास काळे (वय २८, दोघे रा.सैदापूर, सातारा) अशी साताऱ्यातील टोळीची नावे आहेत.

तर सौरभ सुनिल जाधव (वय २२), सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, दोघे रा. गुरसाळे, ता. खटाव) अशी वडूज येथील तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, आकाश वाघले याच्या टोळीवर वाई या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर सौरभ जाधव याच्या टोळीवर बेकायदेशीर पिस्टल बाळगल्याचा वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या दोन्ही टोळ्यातील सातही सदस्यांवर वेळोवेळी कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आल्याच्या तक्रारी पोलीस दलाकडे आल्या होत्या. त्यामुळे वाई व वडूज पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता.

त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आकाश वाघले व त्याच्या टोळीतील सदस्यांना वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यातून तर सौरभ जाधव याच्या टोळीतील सदस्यांना खटाव, माण, फलटण, कोरेगाव, सातारा या तालुक्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर