.......
दरवाढीचा भडका
सातारा : पेट्रोल, डिझेल कसे घ्यायचे? दर वाढल्याने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिक हवालदिल झाले असून त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र शासनाने याबाबत तातडीने कारवाई करून हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणावेत, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. दरम्यान, या दरवाढीने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
.......
योद्ध्यांचा सन्मान
वडूज : कोरोनाकाळात सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या या धाडसी, नियोजनबद्ध कामामुळे कोरोना संकटाविरोधात लढताना बळ मिळाले, असे प्रतिपादन मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले.
.......................................
आंदोलनाचा इशारा
सातारा : शासकीय नियमानुसार उसाची एफआरपी १४ दिवसांत न देणाऱ्या कारखान्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कार्यकारिणीने दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार प्रतिनिधींची बैठक झाली होती. बैठकीत उसाची एफआरपी १४ दिवसांत देण्याचे मान्य करण्यात आले होते.
.............
इमारत वापराविना
कातरखटाव : सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्चाची सुसज्ज इमारत, अद्ययावत सोयीसुविधा, सुसज्ज खोल्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने केवळ डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी येथे यायचे आणि रुग्णांना सेवा द्यायची एवढेच काम बाकी. मात्र, पडळ (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न झाल्याने ही इमारत दिखाव्याची ठरली आहे.
............
सुविधांची वानवा
सातारा : जिल्ह्यातून जमा होणाऱ्या महसुलात मोठा वाटा उचलणाऱ्या गोडोली येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात सुविधांची वानवा आहे. स्वच्छ भारत अभियानाचा डंका देशभरात वाचविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहांचीही सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांची परवड होत आहे.
...........
वाहतूक धोकादायक
पुसेगाव : सातारा-पंढरपूर महामार्गाच्या दुपदरीकरणाची कामे अपूर्ण राहिल्यामुळे रखडली आहे. वर्धनगड घाटातील बायपास वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. बायपासवरील दगडधोंड्यांतून वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवास करणे जिकिरीचे होत असून, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटल्यावर पडलेल्या उसाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.
......................
.......
चित्रकला स्पर्धेत यश
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील नवमहाराष्ट्र विद्यालय येथील प्रतीक हरिश्चंद्र माने याने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या.
उपमार्गावर कचरा
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटारींची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यांमध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागते.
...........
धोकादायक वाहतूक
सातारा : वर्धनगड घाटातून उसाची वाहतूक धोकादायकरीत्या सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वर्धनगड घाटामध्ये रामोशीवाडीजवळ पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनांना येथील बायपास मार्गावरून जावे लागत आहे.