शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच, पाच दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:14 IST

सातारा येथील बुधवार पेठेतील पाच घरे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. मार्केट यार्ड परिसरातील पाच दुकाने फोडल्याचे सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आले. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे साताऱ्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच, पाच दुकाने फोडली मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री चोऱ्या

सातारा : येथील बुधवार पेठेतील पाच घरे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. मार्केट यार्ड परिसरातील पाच दुकाने फोडल्याचे सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आले. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता आहे.याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार पेठेतील लकडी पूल परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून पाच घरे फोडली होती. यामध्ये सुमारे चार लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. शाहूपुरी पोलीस या चोऱ्याचा तपास करत असतानाच दुसऱ्या दिवशीही सलग साताऱ्यात चोरीचे सत्र सुरूच असल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.

मार्केट यार्ड परिसरामध्ये सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडली. यामधून नेमका किती ऐवज चोरीस गेला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, गत आठवड्यात बीट मार्शल पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी २५ अत्याधुनिक दुचाकी देण्यात आल्या आहेत. या दुचाकींद्वारे शहरातून गस्त घातली जात असताना अशा प्रकारे चोºया होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर