शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड

By दत्ता यादव | Updated: October 1, 2022 16:32 IST

घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस

सातारा : आजीच्या घरात लपून बसलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने काल, शुक्रवारी रात्री उशिरा केली.अभिषेक गणेश आवारे (वय २०, रा. आकाशवाणी केंद्राजवळील, झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  आकाशवाणी केंद्राजवळील एका गोदामातून साहित्य चोरीला गेले होते. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, ही घरफोडी करणारा आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या आजीच्या घरात लपला असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तेथे जाऊन अभिषेकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने गोदामातील चोरीसह अन्य एका ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी