शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

उपजिल्हाधिकाºयांचा बंगला फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचा कºहाडातील बंगला चोरट्यांनी फोडला. येथील रुक्मिणीनगरमध्ये घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बंगल्यातून काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील रुक्मिणीनगरमध्ये बिंदुमाधव ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचा कºहाडातील बंगला चोरट्यांनी फोडला. येथील रुक्मिणीनगरमध्ये घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बंगल्यातून काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील रुक्मिणीनगरमध्ये बिंदुमाधव जोशी यांचा ‘चैतन्य’ नावाचा बंगला आहे. बिंदुमाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजय जोशी हे सिंधुदुर्ग येथे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. गत काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्याने बिंदुमाधव जोशी हे मुलगा विजय यांच्याकडे राहण्यास गेले आहेत, तर त्यांच्या कोल्हापूर येथील शेतात मजूर म्हणून काम करत असलेले भरत कुंभार हे काही दिवसांपासून कºहाडमध्ये राहत आहेत.त्यांच्याकडेच जोशी यांच्या बंगल्याची चावी असून, तेच बंगल्याची देखभाल करीत असतात. नेहमीप्रमाणे भरत कुंभार हे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोशी यांच्या बंगल्याकडे गेले असता त्यांना गेटला लावलेले कुलूप तसेच दिसले. मात्र, घराचे कुलूप तोडून कट्ट्यावर टाकले होते. सेफ्टीडोअरचे कुलूपही तुटलेले आणि लाकडी दरवाजाची कडी कापलेली होती. कुंभार यांनी तेथूनच मालक बिंदुमाधव जोशी यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यावेळी जोशी यांनी कुंभार यांना पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.अज्ञातावरगुन्हा दाखलकºहाड शहर पोलिसांनी त्वरित श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. देवघरातील मौल्यवान वस्तू तशाच होत्या. तिजोरीचे कुलूप तोडण्याचा व तिजोरी वाकविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे पोलिसांना दिसून आले. बंगल्यातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मालक स्वत: आल्यानंतर काही गेले असल्यास ते समक्ष सांगतील, असेही कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भरत कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कºहाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.