शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

bullock cart race : पुसेगावमध्ये आनंदोत्सव, बैलांची तसेच खोंडांची वाजत-गाजत काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:47 IST

पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा. बैलगाडा शर्यत शौकीनाकडून न्यायालयांच्या निर्णयाचे जंगी स्वागत.

पुसेगाव : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे बैलगाडा शर्यत शौकीनाकडून जंगी स्वागत करत पुसेगावमध्ये आनंदोत्सव साजरा केला. हलगीचा कडकडाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत शर्यतीत पळणाऱ्या बैलांची तसेच खोंडांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. छ शिवाजी चौकात तसेच ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यापासून शर्यत शौकीन व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. यावर राज्य सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज, गुरुवार (दि.16) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिली. यामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.पुसेगाव यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती. याच यात्रेत खिलार जनावरांचा मोठा बाजार ही भरतो. मात्र शर्यती वरील बंदीमुळे कित्येक वर्षे शर्यती व जनावरांचा बाजारही भरला नाही. खोंडांची मागणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी खिलार गाई पाळणे ही बंद केले होते. अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यावर बैलगाडी शर्यत शौकीनांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBull Cart Raceबैलगाडी शर्यत