शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: July 11, 2024 23:08 IST

दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दिली धडक, फलटण तालुक्यातील विडणी येथे घडला अपघात

दत्ता यादव,लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली. त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात विडणी, ता. फलटण येथे बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेअकरा वाजता झाला. मोतीराम तुळशीराम तायडे (वय ७८, रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा), असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

भानुदास तायडे (रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा) हे व त्यांचा चुलत भाऊ मोतीराम तायडे हे बुलढाण्यावरून आलेल्या दिंडीत सहभागी झाले. पालखी रथाच्या मागे लोकांसमवेत ते चालत निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या (एमएच १२ ईक्यू ५९३०) या ट्रकने मोतीलाल यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली ते सापडले. अशा अवस्थेतही ट्रकचालकाने त्यांना ५ ते ७ फूट फरफटत नेले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक वारकऱ्याला कोणतीही मदत न करता ट्रक घेऊन तेथून निघून गेला. मात्र, काही वारकऱ्यांनी ट्रकचा नंबर पाहिल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या अपघातप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकावर भारतीय न्याय संहिता कायदा (बीएनएस) कलम ३४१, १२५ अ, ब १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अ, बप्रमाणे हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फाैजदार हांगे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Deathमृत्यूSatara areaसातारा परिसर