संदीप कुंभार -- मायणी -खटाव तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दि मायणी अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गुदगे वाड्यातील दोन सख्ख्या भावांचा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सचिन गुदगे यांच्या सक्रिय राजकारणाचा उदय होत असल्याने ही निवडणूक खटाव-माण तालुक्यांच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.खटाव तालुक्याच्या राजकारणामध्ये गुदगे वाड्याचे मोठे महत्त्व आहे. दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांनी १९८५ पासून सलग वीस वर्षे तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. याच दरम्यान त्यांचे मोठे सुपुत्र सुरेंद्र गुदगे यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला होता. १९९२ मध्ये त्यांनी प्रथम पंचायत समितीच्या सदस्य पदापासून सुरुवात केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत ते खटाव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.मागील १५ वर्षांपूर्वी त्यांनी मायणी अर्बन बँकेची सूत्रे आपल्या हातात घेतली व को-आपरेटीव्ह क्षेत्रातील नामांकणाच्या यादीमध्ये बँकेची घोडदौड कायम ठेवली.२००७ मध्ये मायणी जिल्हा परिषद गट स्वत:च्या ताकदीवर निवडून आपला व आजपर्यंत स्वत:कडेच ठेवण्यात ते यशस्वी झालेआहेत. दरम्यानच्या काळामध्ये गुदगे वाड्यामध्ये बरिचशी राजकीय उलथापालथ घडली, परंतु ती बाहेर येत नसल्यामुळे दोघा बंधूंमध्ये नेमका कोणत्या घटनांवरून संघर्ष निर्माण झाला आहे. हे कळू शकत नव्हते; पण आज सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांनी स्वतंत्रपणे आपली भूमिका स्पष्ट केली. सुरेंद्र गुदगे यांनी मायणी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बँक चांगल्या स्थितीमध्ये असल्याने आज अनेकांचा बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगितले.‘मी बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम बँकेत १७ टक्के एनपीएमध्ये असणारी बँक आज पाचच्या आसपास आणलेली आहे. मायणी व वडूज येथे बँकेची स्वमालकीची इमारत उभी करून बँकेची स्थावर मालमत्ता ही वाढवून सभासदांना दहा टक्के लाभांश दिला आहे. बँक सुस्थितीत असल्यामुळे विरोधक बँक घेण्याचा प्रयत्न करत आहे.’-सुरेंद्र गुदगेमायणी अर्बन बँक अध्यक्ष व काही निवडक कार्यकर्त्यांच्या हातातील बाहुले बनलेली आहे. म्हणून मी आज या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे व ही निवडणूक मी माझ्या आई यांच्या मार्गदर्शनाखाली लढवित आहे. आज बँकेच्या १०० कोटींच्यावर ठेवी हव्या होत्या; पण अध्यक्षांच्या हुकुमशाहीमुळे ठेवी वाढल्या नाहीत.- सचिन गुदगे खटाव-माणचे राजकारण ढवळणारमायणी अर्बन निवडणूक सचिन गुदगे यांच्या सक्रिय राजकारणाची सुरुवात करून देणारी ठरत आहे. तसेच या निवडणुकीनंतर खटाव, माणच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असल्याने या निवडणुकीकडे या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
गुदगे वाड्यात ‘भाऊबंदकी’!
By admin | Updated: May 25, 2016 00:32 IST