शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नववधू आली बैलगाडीतून... व-हाड निघालंय लग्नाला-: कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:46 IST

पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक व-हाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून व-हाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले.

ठळक मुद्देवधूसह वºहाडीही सजविलेल्या गाडीतून विवाह मंडपात

कोपर्डे हवेली : बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला  व-हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी कोपर्डे हवेली येथे मंगळवारी एका युवतीच्या विवाहात वºहाडासाठी चक्क बैलगाड्या सजविण्यात आल्या. या बैलगाडीतूनच  व-हाड लग्न मंडपात पोहोचले.

पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक वºहाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून वºहाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले. त्यातच गावात बैलांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. त्यामुळे बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशातच मंगळवारी कोपर्डे हवेली येथील कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांची कन्या पल्लवी व विंग येथील महादेव खबाले-पाटील यांचे चिरंजीव प्रमोद यांच्या विवाहासाठी बैलगाड्यांचा वापर करण्यात आला. हा विवाह धुरूंग मळा येथील एका कार्यालयात संपन्न झाला.

कोपर्डे हवेली ते धुरूंग मळा हे अंतर दोन किलोमीटर आहे. कोपर्डे गावातून सजवलेल्या बैलगाडीतून वधू आणि वºहाड लग्नस्थळी दाखल झाले. यावेळी बैलांना झुली घालून गळ्यात चाळ घातले होते. शिंगाला शेंब्यासह रंग दिला होता.

ग्रामस्थांत कुतूहलगत काही वर्षांपासून बेंदूर सणाला बैलाऐवजी शेती अवजार म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सण साजरा केला जातो. यावर्षी पेरले येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचीच पुनरावृत्ती कोपर्डे हवेली येथे बैलगाडीतून गेलेल्या वºहाडी मंडळींनी केली.

नववधूच्या हातात कासरावराला, वधूला लग्नस्थळी घेऊन जाण्यासाठी मोठ-मोठ्या अलिशान गाड्या, घोडे यांचा वापर केला जातो; पण या लग्नामध्ये वधू बैलगाडीतून दाखल झाली. एवढेच नव्हे तर कासरा हातात घेऊन उभी राहिलेली वधू यावेळी कौतुकाचा विषय ठरली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न