शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाºयाने घातली हवालदाराच्या डोक्यात वीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 10:32 IST

पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा करताना पोलीस पाहायला मिळत होते. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत.

ठळक मुद्दे मी पोलीस निरीक्षक आहे. मी काही केले, तरी माझे कोण काय करणार नाही,' अशा धमक्या त्यांनी दिल्या.

सातारा : जिल्हा जात पडताळणी समितीमधील हवालदाराच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वादावर आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 नितीन अंकुश माने (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.याबाबत हवालदार राम मुकाप्पा कोळी (वय ३०, रा. जवान हाउसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.  कोळी यांची पोलीस मुख्यालयात नेमणूक आहे. सध्या त्यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये नेमणूक देण्यात आली आहे. नितीन माने हे त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. कोळी यांनी फियार्दित म्हटले आहे, बुधवार, दि. ११ रोजी  माने यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये वाद घालत मला शिवीगाळ केली. ‘तुला  दाखवतोच, तुझी नोकरी घालवतो, मी पोलीस निरीक्षक आहे. मी काही केले, तरी माझे कोण काय करणार नाही,' अशा धमक्या त्यांनी दिल्या. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस चौकीच्या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेली वीट माने यांनी डोक्यात व उजव्या हातावर मारून जखमी केले.

पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा करताना पोलीस पाहायला मिळत होते. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस