शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पराभवाचा वचपा काढण्यासाठी चढाओढ !

By admin | Updated: December 31, 2016 21:59 IST

सत्ता बदल होणार का ? : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू; अनेकांची प्रतिष्ठा पणाला

सूर्यकांत निंबाळकर --आदर्की --हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका धैर्यशील अनपट यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विमलताई प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा निसटता पराभव करून राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडले. हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार यांनी दुसरा तरडगाव मतदारसंघ निवडल्यास धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील गत पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरल्यास निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावे दुष्काळी होती. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी आमदार चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, साखरवाडीच्या न्यू शुगरचे सर्वेसर्वा प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे वर्चस्व होते; पण ३१ डिसेंबर ११ रोजी आदर्कीच्या माळावर पाणी पूजन झाले. अन् दुष्काळी भागातील शेतकरी वर्गाने रामराजे नाईक-निंबाळकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या. साखरवाडी गटात संजीवराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध प्रल्हादराव साळुंखे-पाटील अशी लढत तर हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात त्यांच्या पत्नी विमलताई साळुंखे-पाटील तर मुलगा धनंजय साळुंखे-पाटील पंचायत समिती निवडणुकीत त्यामुळे प्रचार यंत्रणाचे लक्ष साखरवाडी मतदार संघात गुंतली. त्यामुळे बालेकिल्ल्यात दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा सिंह गेला अन् धनंजय पाटील पंचायत समितीवर निवडून येऊन सुरवडीचा गड राखला. पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट यांच्या माध्यमातून धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांनी मतदार संघात संधीचे सोने करून राष्ट्रवादी व रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांचे निष्ठावंतपणे काम केल्याने कोट्यवधीचा निधी मतदार संघात खर्च केला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी प्रत्येक गावात वैयक्तिक ताकदीवर कार्यकर्त्याला ताकद देऊन सत्ता असो वा नसो हिंगणगाव मतदार संघावर पकड ठेवली आहे. सुरवडी पंचायत समिती गणात गेली २० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे तर हिंगणगाव पंचायत समिती गणावर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघावर मात्र प्रत्येक पाच वर्षांनी सत्ता बदल होत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजीवराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, विलासराव झणझणे, डॉ. पद्मराज भोईटे, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विलासराव नलवडे इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतेयराष्ट्रीय काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील, धनंजय साळुंखे, सुरेश भोईटे, सुरेश साक्षे इच्छुक आहेत. भाजप सुरेश निंबाळकर, हणमंत नलवडे, विशाल झणझणे.हिंगणगाव पंचायत समिती गण राष्ट्रवादी : लतिका अनपट, योगिता झणझणे, स्वाती भोईटे, पुष्पा तानाजी धुमाळ तर राष्ट्रीय काँग्रेस सीमा भोईटे इच्छुक आहेत.सुरवडी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. यामधून प्रियांका सरक, मजूंषा भोसले, विद्या अंकुश देवकर इच्छुक आहेत. शिवसेना जिल्हा परिषदसाठी हणमंत बासर तर रासप तर्फे खंडेराव धरक इच्छुक आहेत.