शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केळवली धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:38 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांना मृतदेह शोधण्यात यश

सातारा : सातारा तालुक्यातील केळवली धबधब्यात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी बुडालेल्या तरुणाचा चौथा दिवशी म्हणजे आज, मंगळवारी सकाळी सात वाजता मृतदेह सापडला. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर काही वेळातच तरुणाचा मृतदेह धबधब्याच्या खोल पाण्यात आढळून आला. राहुल सुभाष माने (वय १८, रा. विकासनगर सातारा) असे धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका महाविद्यालयातील सहा ते सातजण केळवली धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी राहुल माने हा अचानक धबधब्यात गायब झाला. याची माहिती पोलीस व त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर सर्वजण धबधब्याजवळ पोहोचले; मात्र अंधार असल्यामुळे सर्वजण परत आले. दुसऱ्या दिवशी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. सलग तीन दिवस पोलीस व रेस्क्यू टीमच्या जवानांकडून राहुल मानेचा शोध घेतला जात होता. आज, मंगळवारी सकाळी सात वाजता पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी धबधब्यातील खोल पाण्यात राहुल मानेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचाराहुल माने हा वडिलांना घरातून न सांगताच मित्रांसोबत फिरायला गेला होता. मात्र, धबधब्याजवळ गेल्यानंतर त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल केला. मी मित्रांसोबतच आहे. घरी संध्याकाळी लवकर येतो असे तो म्हणाला. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, एवढ्या लांब कशाला गेलास. जवळच फिरून घरी यायचे ना; पण त्याने आता मी आलोय. असं सांगून फोन ठेवला. बाप-लेकाचा हा व्हिडिओ काॅल शेवटचा ठरला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे