शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, पार्टी करुन पोहायला गेले असता घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 16:36 IST

माणिक डोंगरे मलकापूर : पार्टीसाठी गेलेला इसम कोयना नदीपात्रात बुडाला होता. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर बुधवारी ...

माणिक डोंगरेमलकापूर : पार्टीसाठी गेलेला इसम कोयना नदीपात्रात बुडाला होता. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर बुधवारी (दि. २८) ही घटना घडली होती. बुडालेल्या इसमाच्या मृतदेहाचे शोधकार्य तीन दिवसांपासून सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळला. दादासाहेब आर्जून दनाने (वय ४६ रा. जयमल्हार कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर  ता. कराड) असे मृताचे नाव आहे.  घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब दनाने यांच्यासह पंधरा जण पार्टी करण्यासाठी आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ असलेल्या जाधव पानवठ्यावर गेले होते. पार्टी करून सर्वजण नदीत पोहायला गेले होते. सर्वजण नदीतून बाहेर आले मात्र दादा दनाने हा कोणाला दिसलाच नाही. तो नदीपात्रात बुडाला याची खात्री झाल्यानंतर शोधाशोध करूनही तो सापडला नाही. यानंतर संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घाटनास्थळी धाव घेतली. दनाने यांचा शोध घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले. मात्र शोध लागला नाही. आज, शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही शोध घेताना त्याचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळला. दनानेचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडdrowningपाण्यात बुडणे