सातारा : सातारा शहरासह कऱ्हाड, वाई, फलटण, कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, खंडाळा, माण तालुक्यांत शनिवारी दुपारी वळवाच्या पावसाने झोडपून काढले. खटाव, कोरेगाव तालुक्यांत गारपीट झाली असून, अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घरे, गोठ्यावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली आहेत. शेतात पाणी साठले होते. सातारा जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून उन्हाचा कडाका वाढला होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास ढगांच्या गडगडाटांसह पंधरा मिनिटे हलका पाऊस झाला. कऱ्हाडमध्ये फलक कोसळले कऱ्हाड शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे शहरातील फलक रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वडगाव हवेलीत ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे छत उडून गेले. पाचवड फाट्यावर झाडे पडली कऱ्हाड-चांदोली मार्गावर पाचवड फाटा ते धोंडेवाडी दरम्यान पंधरा ते वीस झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ झाडे उचलण्याचे काम करीत होते.
गारांसह वळवानं झोडपलं
By admin | Updated: April 12, 2015 00:43 IST