शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

आंधळीचा ठकसेन महेश माने गजाआड

By admin | Updated: January 18, 2015 00:21 IST

सातारच्या अकराजणांना गंडा : पोलीस, वनखात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन

सातारा : शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून सातारा तालुक्यातील अकरा युवकांची फसवणूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आंधळी येथील महेश नानासाहेब माने या युवकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याने संबंधित युवकांची ४.१0 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गणेश रघुनाथ जानकर (वय २३, रा. माचीपेठ, समर्थ मंदीर, सातारा) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नानासाहेब माने (रा. आंधळी, ता. पलूस, जि. सांगली) याने आॅगस्ट २0१४ ते आॅक्टोबर २0१४ या कालावधीत सातारा तालुक्यातील अमोल पवार, मंगेश भांडळकर, रोहित सावंत, सुनील मेळाट, अमित धोत्रे, सोमनाथ बोभाटे, सुरज कोळी, सुधीर मुळे, अजित देशमुख, ओंकार मालुसरे, सागर गुजर या युवकांची अनेकदा भेट घेतली. या भेटीत त्याने आपली राजकीय मंडळींशी ओळख असून मी तुम्हाला आरोग्य विभाग, महसूल खाते, पोलीस त्याचबरोबर वनखात्यात नोकरी लावतो, असे सांगितले. यावेळी त्याने प्रत्येकाला आपला मोबाईल नंबरही दिला आणि या युवकांचेही नंबर घेतले. यानंतर तो प्रत्येकाशी वारंवार संपर्क साधून काम होणार असे आश्वासन देत होता. काही दिवसानंतर तो सातारा येथे आला आणि या युवकांकडून पैसे घेतले. तिघांकडून त्याने प्रत्येकी ५0 हजार घेतले तर उर्वरित युवकांकडून २0 हजार, १५ हजार, १0 हजार अशी रक्कम घेतली.दरम्यानच्या काळात सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेतील भरती झाली मात्र, या भरतीत या युवकांचा समावेश झाला नाही. यामुळे या युवकांनी त्याच्याशी संपर्क साधला त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. अनेकदा तर तो मोबाईलही उचलत नव्हता. यामुळे संबंधित युवकाच्यावतीने गणेश रघुनाथ जानकर याने शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार एस. जी. देशमाने करत आहेत. (प्रतिनिधी)पहिल्या भेटीत ओळख अन् दुसऱ्या भेटीत पैसेमहेश नानासाहेब माने याने साताऱ्यात येऊन संबंधित अकरा युवकांच्या दोनवेळा भेटी घेतल्या. पहिल्याच भेटीत या युवकांना भुरळ पाडली. आपल्या ओळखी कुठे आहेत आणि कोणाकोणाला नोकरीला लावले याची माहिती त्याने युवकांना दिली. दुसऱ्या भेटीत मात्र, त्याने प्रत्येकाकडून काही रक्कम घेतली आणि आता आपण आॅर्डर घेऊनच भेटू असे सांगितले. महेशने पहिल्या भेटीत प्रत्येकाची ओळख करून घेतली आणि दुसऱ्या भेटीत त्याने प्रत्येकाकडून पैसे घेतले.