शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चितळीतील घरफोडीत १६ तोळ्यांचे दागिने लंपास, भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 10:47 IST

मायणीतील दोन पानटपऱ्या व चितळी येथील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चितळीतील एकाच घरातून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने नेण्यात आले आहेत. एकाच रात्रीत या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देचितळीतील घरफोडीत १६ तोळ्यांचे दागिने लंपास, भीतीचे वातावरणमायणीत दोन पानटपऱ्या तर चितळीत पाच घरे फोडली

मायणी : मायणीतील दोन पानटपऱ्या व चितळी येथील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चितळीतील एकाच घरातून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने नेण्यात आले आहेत. एकाच रात्रीत या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मायणी येथील मोराळे आणि वडूज रस्त्यावरील दोन पान टपऱ्या अज्ञात चोरांनी फोडल्या. या दोन्ही टपऱ्यातील अंदाजे १३०० रुपयांची रोकड लंपास केली. तसेच चितळी येथेही चोरीच्या घटना घडल्या.चितळीतील दिलीप संभाजी कुंभार हे कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून घराच्या छतावरती झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास वडील जागे झाल्यानंतर घरावरून खाली आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी घरातील इतरांना जागे केले. त्यावेळी कपाटातील कपडे विस्कटलेली दिसली. तसेच लोखंडी पेटी व लाकडी कपाटातीलही साहित्य विस्कटलेले आढळले.

या चोरीदरम्यान, अज्ञाताने तीन तोळे वजनाचा राणीहार, सोन्याची चेन, अर्धा तोळा वजनाची कानातील फुले, एक तोळ्याची बोरमाळ, अडीच तोळ्याचे गंठण, दोन सोन्याच्या अंगठ्या, बहिणीचे गंटण, नेकलेस आदी मिळून सुमारे १६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने नेले. या दागिन्यांची आजच्या बाजारभावाने किंमत सुमारे ४ लाखांवर आहे. तसेच यावेळी रोखडही लंपास करण्यात आली.याच दरम्यान चितळी गावातील दादा विठ्ठल भिसे, यशवंत उत्तम चव्हाण, नारायण संतु भिसे, मंगल दीपक खवळे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नसल्याचे दिसून आले. या चोरीनंतर साताऱ्याहून ठसे तज्ज्ज्ञ व श्वान पथक बोलविण्यात आले होते. या चोरीची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर