विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव : राहुल मखरे 

By नितीन काळेल | Published: February 10, 2024 08:28 PM2024-02-10T20:28:55+5:302024-02-10T20:29:25+5:30

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते.

BJP's defeat if opposition fight together says Rahul Makhare | विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव : राहुल मखरे 

विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव : राहुल मखरे 

सातारा : आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार नाही,’ असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांनी केला.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते. बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्यानंतर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, प्रदेश सचिव तुषार मोतलिंग, अमोल लोंढे, आर. आर. पाटील, सागर सुतार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. मखरे म्हणाले, बहुजन मुक्ती पार्टीची देशातील ३२ राज्यात कार्यकर्त्यांची फळी आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर आताची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. कारण, देशात जात-धर्माच्या नावाने विशिष्ट लोकांकडून द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यातच भाजपचे सरकार देशात आपली सत्ता येणार नाही म्हणून इडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा वापर करत आहे. 

यासाठी आताच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व विरोधक एकत्र आलेतर भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या आत येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत आताच सर्व्हे समोर आणले जात आहेत. ४०० हून अधिक जागा मिळणार म्हणून सांगितले जात आहे. कोणाला न विचारताच हे सर्व्हे होत आहेत. यातून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
 

Web Title: BJP's defeat if opposition fight together says Rahul Makhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.