शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Udayanraje Bhosale : "कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 09:51 IST

Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली.

कोरेगाव : सातारा लोकसभा निवडणुकीने सर्वांना दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यात कोण म्हणतो म्हणून नेतृत्व करतो का, मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच या जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. म्हणताय तर दंड थोपटतोच, असे म्हणत दंड थोपटून खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय वाटचालीचा संदेश सर्वसामान्य जनतेला दिला. यावेळी चिंगळी- पिंगळी असे म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट टीकास्त्र सोडले.

कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जितराज मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी ३ वा. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यातील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शा‍ब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

कोणीही किती शड्डू ठोका. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले.  सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करून विजयी केले आहे. या विजयाबद्दल लोकशाहीतील तुम्हा राजे मंडळींचा मी ऋणी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावणार आहे, असा निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. 

सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. व्यासपीठावर सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठांच्या आठवणींना उजाळाउदयनराजे भोसले यांचा पहिलाच आभार दौरा असल्याने त्यांनी जोशपूर्ण भाषण केले. विरोधकांवर टीका करत असताना त्यांनी आपले पिताश्री प्रतापसिंह महाराज भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सातारा जिल्ह्यात अभयसिंहराजे भोसले, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ, शंकरराव जगताप, डॉ. शालिनीताई पाटील, पी. डी. पाटील साहेब, विलासराव पाटील -उंडाळकर व विक्रमसिंह पाटणकर यांचा आदराने उल्लेख करत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांचे सान्निध्य लाभले असल्याचे सांगत नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द ते खासदार पदापर्यंतचा खडतर प्रवास त्यांनी उलगडला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर