शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: जमिनीच्या वादातून शिवनेरी शुगर्समध्ये भाजपाच्या मंडलाध्यक्षांवर कोयत्याने वार, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:39 IST

कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स साखर कारखाना कार्यक्षेत्रात जमिनीच्या वादातून जयपूर येथील भाजपाचे पंचायतराज ग्रामविकास विभाग रहिमतपूर मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ कृष्णत निकम यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. एकसळ येथील सचिन शेलार यांनी वार केल्याचे आरोप सोमनाथ निकम यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी केला आहे. या घटनेने रहिमतपूर परिसरासह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील सोमनाथ निकम यांची शिवनेरी शुगर्स कारखाना कार्यक्षेत्र लगत शेतजमीन आहे. या जमिनीवरून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांचे कारखाना उभारणीपासून वाद आहेत. सोमनाथ निकम यांनी आपल्या मालकीची काही जमीन कारखाना व्यवस्थापनाला वापरासाठी दिलेली आहे.या जागेवरच कारखाना व्यवस्थापनाकडून काँक्रीट करण्याचे काम सुरू होते. रविवार, दि. १९ रोजी दुपारी याबाबतची माहिती मिळताच सोमनाथ निकम हे बंधू श्रीकांत निकम याच्याबरोबर कारखाना स्थळावर गेले. सोमनाथ निकम यांनी आमच्या परवानगीशिवाय आमच्या जमिनीत तुम्ही काँक्रिटीकरण का करताय, अशी विचारणा कारखाना व्यवस्थापनाला केली. कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांच्यात वाद झाला. यादरम्यानच पैलवान सचिन शेलार हे सहा-सात जणांबरोबर घटनास्थळी आले. त्यातील एकाने श्रीकांत निकम यांना धरून ठेवले तर सचिन शेलार याने सोमनाथ निकम यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले असल्याचे श्रीकांत निकम यांनी सांगितले. सोमनाथ निकम यांच्यावर रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली नाही.