शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार', शुभेच्छांचे फ्लेक्स लावत साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:54 IST

कुत्र्याच्या वाढदिनी फ्लेक्स, केक अन् फटाके !....भर चौकातील अनोखी ‘सातारी त-हा’ पाहण्यासाठी लोकांची गर्दी

सातारा : एकीकडे सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्याबद्दल कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहीम सातारा पोलिसांनी तीव्र केली असतानाच दुसरीकडे भर चौकात भला मोठा फ्लेक्स लावून, केक कापून अन् फटाके उडवून लाडक्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्याची घटना करंजे परिसरात घडली. विशेष म्हणजे, 'लकी'चा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसांचीही परवानगी घेण्यात आली. 

सातारकर तसे खूप हौशी. त्यांच्या ‘सातारी त-हा’ही हटकेच. ते कधी काय करतील, सांगता येत नाही. करंजे परिसरातील राजेंद्र कुंभार यांच्या ‘लकी’ नावाच्या रॉटव्हिलर पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी (2 एप्रिल) रात्री बाबर चौक परिसरातील नागरिक एकत्र जमले. चौकातील भल्या मोठ्या फ्लेक्सवर ‘लकी’चा फोटो लावण्यात आला. त्यावर ‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार आमच्या लकीला सातव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असा मजूकरही दिसत होता. विशेष म्हणजे त्याला शुभेच्छा देणा-या मित्र परिवाराचाही खाली उल्लेख करण्यात आला होता.

येथील चौकात लकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यात आला. लकीला केक भरवण्यात आल्यानंतर रस्त्यावर जोरदार फटाकेबाजी करण्यात आली. ‘लकी’चा हा सातवा वाढदिवस साजरा होत असताना उपस्थित मंडळींनीही मोठ्या कौतुकाने टाळ्या पिटल्या. 'गेल्या सात वर्षांपासून लेकीचा वाढदिवस आम्ही थाटात साजरा करतो. दोन-तीन वर्षे आम्ही फ्लेक्स लावले होते.  मात्र एका रात्रीत काही जणांनी ते चोरून नेले होते. त्याचे कारण काही कळाले नाही. मात्र यंदा चौकात स्ट्रीटलाईट असल्यामुळे आणि आमचे कार्यकर्ते जागत असल्यामुळे फ्लेक्सला धक्का लागला नाही,' अशी माहिती 'लकी'चे मालक राजेंद्र कुंभार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.  दरम्यान, हजारो रुपये खर्चून कुत्र्याचा वाढदिवस सार्वजनिक स्थळी जोरात साजरा करण्याच्या या ‘सातारी त-हा’ची मंगळवारी दिवसभर साता-यात चर्चा सुरू होती.

टॅग्स :dogकुत्राSatara areaसातारा परिसर